रविवार, २६ जुलै, २०१५

प्लूटो बद्दल बोलू काही ……………………………!!!!!!

                                                 प्लूटो बद्दल बोलू काही ……………………………!!!!!!
प्लूटोचा शोध 1930 साली लागला व तेव्हापासून 2006पर्यंत प्लूटोला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेच्या (आयएयू) व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळण्यात आले व त्याचे वर्गीकरण एरिस व सेरेससोबत बटु ग्रह या नवीन वर्गात करण्यात आले.
प्लूटो मुख्यत्वे दगड व बर्फ यांच्यापासून बनला असून, वस्तुमानात पृथ्वीच्या चंद्राच्या अंदाजे एक पंचमांश व आकारमानात त्याच्या अंदाजे एक तृतियांश आहे. भ्रमणकक्षा अती-लंबवर्तुळाकार आ
यान आणि संपर्क
- मिशन टीममधील संशोधक यानाशी संपर्क साधून त्याचे तापमान, यंत्रसामग्रीची व इंधनाची माहिती घेतात. त्याचबरोबर यानाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी संदेश पाठवतात व त्याच्यापासून मिळालेली माहिती एकत्र करतात.
- पृथ्वीवरून पाठविलेले संदेश प्लूटोजवळील "न्यू हॉरिझॉन्स'पर्यंत पोचायला साडेचार तास लागतात व तेथून उत्तर येण्यासाठी आणखी साडेचार तासांचा वेळ जातो.
- "नासा'चे कॅलिफोर्निया, स्पेन आणि ऑस्ट्रेलियातील डीप स्पेस नेटवर्क (डीएसएन) ऍन्टिना संदेशवहनाचे काम करते. पृथ्वीच्या परिवलन कसेही असले तरी हा संपर्क कायम राहतो.
- सिक्वेन्सिंग या प्रक्रियेद्वारे यानापासून आलेल्या माहितीचे विश्‍लेषण होते व ही माहिती "डीएसएन'कडे पाठविली जाते.
- डीएसएन ही माहिती पुन्हा न्यू हॉरिझॉन्सकडे पाठवते.
- न्यू हॉरिझॉन्स या माहितीवर प्रक्रिया करून ती पुन्हा पृथ्वीवर पाठवते. ही माहिती पृथ्वीवर पोचण्याचा वेग सेकंदाला 3 हजार बिट्‌स आहे.
- हा डाटा रोजच्या रोज साठवून ठेवला जातो.
---------
मिशनची सुरवात ः जानेवारी 2006
यानाचा वेग- 43,000 किलोमीटर प्रतितास
कापलेले अंतर- 3 अब्ज किलोमीटर
मोहिमेचा खर्च- 70 कोटी डॉलर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

COMPUTER

 WHAT IS COMPUTER ? C : Commonly O : Operated M : Machine P : Particularly U : Used for T : Technical E : Education R : Research