सोमवार, २५ जानेवारी, २०२१

तिरंगा

जाणून घ्या कशी आहे तिरंगा बनवण्याची प्रक्रिया आणि अधिकृत तिरंग्याची वैशिष्ट्ये!

👉प्रत्येक देशासाठी त्याची अभिमान स्थाने ठरलेली असतात.  जगाच्या पातळीवर प्रत्येक देशाचे नेतृत्व त्याचा झेंडा करत असतो. त्यामुळे झेंड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच झेंड्याविषयी काही रंजक माहिती जाणून घेऊयात: 

👉भारतीय झेंडा फक्त एकाच कंपनीकडून बनवण्यात येतो. भारतासाठी कर्नाटकातल्या हुबळी युनिट कडून आपला तिरंगा बनवण्यात येतो. कर्नाटक खादी ग्राम उद्योगकडून ही झेंडा बनवण्याची कामगिरी केली जाते. 

👉तिरंगा अनेक टप्प्यांनंतर तयार होतो. ज्यात धागा तयार करणं, कपडा तयार करणं, ब्लीचिंग व डाइंग चक्राची छपाई, तीन पट्ट्यांची शिलाई, इस्त्री करणं आणि टॉगलिंग यांचा समावेश आहे. 

👉राष्ट्रीय ध्वजाची क्वालिटी BIS चेक करतात. प्रत्येक सेक्शनमध्ये एकूण 18 वेळा तिरंग्याची क्वालिटी चेक केली जाते.

 

कोणकोणता तिरंगा अधिकृत?

◼️ सरकारी मीटिंग्स आणि कॉन्फरन्स इत्यादी टेबलवर ठेवला जाणाऱ्या झेंड्याला अधिकारिक महत्व प्राप्त आहे.

◼️ संवैधानिक पदांवर असलेल्या व्हीव्हीआयपी कार्ससाठी.

◼️ संसद आणि मंत्रालयांच्या रूम्समध्ये क्रॉस बारवर दिसणारे झेंडे अधिकारिक असतात.

◼️ सरकारी कार्यालये आणि छोट्या इमारतींवर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांना अधिकारिक दर्जा प्राप्त आहे.

◼️ इतकेच नाही तर शहीद सैनिकांच्या पार्थिवावर ठेवण्यासाठीही अधिकारिक ध्वजाचा वापर केला जातो.

◼️परेड करणाऱ्या सैनिकांच्या गन कॅरिएजवर लावलेला झेंडाही अधिकारिक असतो.

◼️लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालये, संसद भवन, राष्ट्रपती भवन यांवर लागणारे झेंडेही अधिकारिक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

COMPUTER

 WHAT IS COMPUTER ? C : Commonly O : Operated M : Machine P : Particularly U : Used for T : Technical E : Education R : Research