🔶दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान🔶
👉 ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
👉 ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
👉 ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
👉आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
👉 ० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
👉 मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.
👉 ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.
👉मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.
👉माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.
👉डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.
👉मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
👉 इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
👉मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
👉 ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
👉 मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त प्रमाणात असते.
👉मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
👉कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.
👉 तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.
👉 रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
👉पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर
व कावीळ.
👉 हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा
👉मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.
👉मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी
👉 रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
👉नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
👉 सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
👉 हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
👉पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
👉 रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.
👉शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.
👉रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.
👉शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले जाते.
👉शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक करतो.