गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

डॉली कोण होती?

डॉली एक मेंढी होती, असं सांगितलं तर ते तिच्यावर अन्याय करण्यासारखं होईल. कारण डॉली ही साधीसुधी मेंढी नव्हती. विज्ञानाच्या घोडदौडीत एक महत्त्वाची भूमिका बजावणारी ती एक विलक्षण मेंढी होती. कारण ज्याला केवळ माता आहे पण पिता अजिबात नाही, असा तो जगातला पहिला प्राणी होता. सामान्यपणे कोणत्याही सस्तन प्राण्याची संतती ही स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांच्या मीलनातून जन्माला येते.

अशा त-हेनं फलित झालेल्या स्त्रीबीजापासून पिंडपेशी आकार घेते आणि तिचीच वाढ व विकास होत संपूर्ण प्राणी तयार होतो. त्यामुळेच कोणत्याही प्राण्याच्या आनुवंशिक गुणधर्मामध्ये माता आणि पिता यांच्याकडून मिळालेल्या वारशाचा सारखाच सहभाग असतो. निम्मी जनुकं मातेकडून मिळतात, तर पिता उरलेल्या निम्म्या जनुकांचं दान देतो. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात जनुकांचा संपूर्ण साठा असतो. हा गुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये विसावलेला असतो. मानवप्राण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, गुणसूत्रांच्या एकूण तेवीस जोड्या शरीराच्या

प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असतात. यापैकी बावीस जोड्या समानधर्मी असतात, तर तेविसावी प्राण्याचं लिंग निर्धारित करणारी जोडी समानधर्मीही असते किंवा विषमधर्मीही असते, मुलीच्या शरीरातली ही जोडी समानधर्मी असते, तर मुलांच्या शरीरातील जोडी विषमधर्मी असते. या नियमाला एक अपवाद आहे, तो म्हणजे स्त्री काय किंवा पुरुष काय, यांच्या शरीरातल्या बीजपेशींचा, स्त्रीबीजामध्ये फक्त तेवीस गुणसूत्रंच एकेकटी असतात. त्यांचा जोडीदार उपस्थित नसतो. पुरुषांच्या शुक्राणूंमध्येही हीच स्थिती असते. त्या दोन बीजांचं मीलन झाल्यानंतरच तेवीस जोड्या जमतात, जनुकांचा संपूर्ण साठा तयार होतो. तोच मग त्या पिंडपेशीच्या पुढच्या वाटचालीची सर्व जबाबदारी सांभाळत पूर्ण वाढीचा प्राणी तयार करतो. अर्थातच त्या प्राण्याचे आनुवंशिक गुणधर्म ही मातापित्यांच्या गुणधर्मांची सरमिसळ असते.
पण डॉलीचा जन्म तसा नैसर्गिकरित्या झालेला नव्हता. त्यासाठी डॉलीच्या आईच्या बीजपेशीतून शिव्या केंद्रकाची हकालपट्टी करण्यात आली होती. म्हणजे त्या पेशीतील गुणसूत्रे, अर्थातच जनुकांचा साठा काढून टाकण्यात आला होता. त्या रिकाम्या झालेल्या पेशीमध्ये मग त्याच आईच्या आवळांच्या पेशीमध्ये केंद्रक प्रत्यारोपित करण्यात आलं होतं. म्हणजेच आता त्या नव्यानं तयार केलेल्या पिंड पेशीतील गुणसूत्राच्या सर्वच जोड्या केवळ आईकडूनच मिळालेल्या होत्या. जनुकांचा असा संपूर्ण साठा मिळाल्यामुळे ती पेशी फलित पेशीसारखीच वागू लागली. तिची वाढ झाली आणि नंतर आईच्या गर्भाशयात तिचा विकासही झाला. योग्य वेळी आई प्रसूत होऊन डॉली जन्माला आली. पण आता डॉलीच्या अंगच्या आनुवंशिक गुणधर्माचा संपूर्ण वारसा तिला केवळ आईकडूनच मिळालेला होता. एका अर्थी ती आपल्या आईची जम् झेरॉक्स प्रतच होती. या संपूर्ण प्रक्रियेत कोणाही नराचा म्हणजेच पित्याचा सहभाग नव्हता. या प्रक्रियेला क्लोनिंग असं म्हणतात. याप्रकारे केवळ एकाच पितराचा वारसा मिळाल्यामुळे त्याची किंवा तिची हुबेहूब प्रत बनणारी डॉली ही या जगातली पहिली प्राणीमात्र ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

COMPUTER

 WHAT IS COMPUTER ? C : Commonly O : Operated M : Machine P : Particularly U : Used for T : Technical E : Education R : Research