रक्त(BLOOD)
रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते. पांढऱ्या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. पृष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते. संधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते. कीटक आणि काहीं मृदुकाय प्राण्यामध्ये हिमोलिंफ नावाचा द्रव, प्राणवायू वहनाचे कार्य करतो. हिमोलिंफ बंद रक्तवाहिन्यामध्ये नसते. ते रक्तवाहिन्या आणि शरीर यांच्या मधल्या पोकळ्यांमधून वाहते. बहुतेक कीटकांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनासाठी हिमोग्लोबिन सारखा वाहक रेणू नसतो. कीटकांच्या लहान आकारामुळे त्यांच्या शरीरातील श्वासनाल सर्व भागापर्यंत प्राणवायू वहनाचे कार्य करतात. जंभ पृष्ठवंशी प्राण्यामध्ये श्पांढऱ्या पेशींवर आधारलेली प्रतिरोधक यंत्रणा असते. या पेशी परजीवी जिवाणूंचा प्रतिकार करतात. बिंबिका या रक्त क्लथन(गोठणे) होण्यासाठी आवश्यक असतात. संधिपाद प्राण्यामध्ये असलेल्या हिमोलिंफ मध्ये असलेल्या हिमोसाइट प्रतिरोधक्षम असतात. रक्त रक्तवाहिन्यांमधून वाहते. हृदयाच्या साहाय्याने रक्त शरीरभर वाहते ठेवले जाते. त्यासाठी हृदय हे पंपाप्रमाणे कार्य करते. फुप्फुसधारी प्राण्यांमध्ये प्राणवायूयुक्त रक्त रोहिण्यांमधून शरीरास पुरवले जाते. नीलेतील रक्तात कमी झालेल्या प्राणवायूची जागा तेवढ्याच कार्बन डाय ऑक्साइडने घेतलेली असते. श्वास घेतल्यानंतर हवेमधील प्राणवायू फुप्फुसामध्ये रक्तात मिसळतो. उछ्वास सोडताना कार्बन डाय ऑक्साइड फुप्फुसातून बाहेर पडतो. वैद्यकीय परिभाषेनुसार हीम किंवा हिमॅटो हा शब्द जुन्या ग्रीक भाषेमध्ये वापरतात. शरीरशास्त्र आणि उतीशास्त्रानुसार रक्त हा संयोजी उतींचा एक विशिष्ट प्रकार आहे. रक्ताचा उगम अस्थिमज्जेमध्ये होतो. रक्तामधील फिब्रिनोजेन यकृतपेशींमध्ये तयार होते.
रक्ताचे कार्य
रक्त शरीरामधील अनेक महत्त्वाची कार्ये करते-- उतींना प्राणवायू पुरवणे (हिमोग्लोबिन प्राणवायू बरोबर बद्ध होऊन. हिमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीमध्ये असते).
- यकृताकडून ग्लूकोज, अमिनो आम्ले, आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लूकोज आणि अमोनियाआम्ले मात्र रक्तरसामध्ये (प्लाझमा) विरघळलेली असतात.
- कार्बन डायऑक्साइड, यूरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते.
- श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती.
- रक्त क्लथन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा . शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तक्लथन (गोठणे) यंत्रणा कार्यांन्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्राँबिनच्या तंतूंमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते.
- संप्रेरकांचे वहन- ही शरीराची उतीना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे.
- रक्ताचे सामू नियंत्रण.
- शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
- द्रवीय कार्य. (हायड्रॉलिक)
मानवी रक्ताचे घटक
मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते. रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात. रक्तपेशीमध्ये एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी; ल्यूकोसाइट्स- पांढऱ्या रक्त पेशी , आणि थ्राँबोसाइट्स- बिंबिका किंवा रक्तकणिका असतात. घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये ४५% लाल रक्तपेशी आणि ५४.३% रक्तद्रव वा ०.७% पांढऱ्या रक्त पेशी असतात. रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो. तांबड्या रक्तपेशीमधील हीमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.लाल रक्तपेशी
Erythrocytes ४.७ ते ६.१ मिलियन (पुरुष) , आणि ४.२ ते ५.४ मिलियन (स्त्री): लाल रक्तपेशींमध्ये रक्तामधील हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन प्राणवायू वाहून नेते. बहुतेक सस्तन प्राण्यांमधील पूर्ण तयार लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक आणि पेशी अंगके नसतात (अपवाद उंट). लाल रक्तपेशी (केशिकच्या भित्ति पेशी आणि काही इतर पेशी) भित्तिकेवर ग्लायकोप्रथिने असतात. या विशिष्ट ग्लायकोप्रथिनामुळे रक्तगट ठरविता येतात. नुकतेच काढलेले आणि गोठण प्रतिबंधक रसायने घातलेले रक्त अपकेंद्रत्सारी(सेंट्रीफ्युगल) यंत्रामध्ये घालून फिरवले असता रक्तरस आणि पेशी यांचे एक विशिष्ट प्रमाण मिळते. त्याला हिमॅटोक्रिट असे म्हणतात. सामान्य रक्तामध्ये हे प्रमाण ४५% असते. शरीरातील सर्व लाल रक्तपेशीचा एकत्रित पृष्ठ्भाग शरीराच्या बाह्य पृष्ठभागाच्या सुमारे २००० पटीएवढा असतो.पांढऱ्या रक्त पेशी
Leukocytes सुमारे ४००० ते ११००० . पांढऱ्या रक्त पेशी शरीराच्या प्रतिकार यंत्रणेचा भाग आहेत. रक्तप्रवाहातील आणि संयोजी उतीमधील अकार्यक्षम पेशी, पेशींचे अवशिष्ट भाग हे पांढऱ्या रक्त पेशी काढून टाकतात. त्याचबरोबर परजीवी आणि परकीय पदार्थांवर हल्ला करतात. पांढऱ्या रक्त पेशींच्या कर्करोगास ल्युकेमिया म्हणतात.पांढऱ्या रक्त पेशींचे न्युट्रोफिल्स, लिम्फोसाईट्स, इओसिनोफील्स, बेसोफील व मोनोसाईट्स प्रकार आहेत.
रक्तकणिका
Thrombocytes २००,००० ते ४००,००० याना प्लेटलेट किंवा बिंबिका असेही म्हणतात. रक्तकणिका रक्त क्लथनास मदत करतात. त्यांच्या साहाय्याने फायब्रिनोजेनला फायब्रिनमध्ये बदलते. फायब्रिनमुळे रक्तामध्ये झालेल्या तंतुमय गाठीत लाल रक्तपेशी अडकतात. यामुळे शरीरातील रक्त शरीराबाहेर येणे थांबते. जंतुसंसर्ग टळतो.साधारणपणे मानवी रक्ताचे रक्तरस/पेशी प्रमाण (हिमॅटोक्रिट) पुरुष ४५ ±७( ३८-५२% ) ; स्त्री ४२ ± ५ (३७-४७%) ; सामू ७.३५-७.४५ ; रक्तामधील प्राणवायू ८०-१०० mmHg , कार्बन डाय ऑक्साइड ३५-४५ mmHg आणि HCO3 - २१-२७ mM एवढा असतो. धमनीमधील रक्तात ९८-९९% प्राणवायू असतो. तर शिरेमधील रक्तात प्राणवायूचे प्रमाण ७५% असते. रक्तास शुद्ध आणि अशुद्ध रक्त म्हणण्याचे काहीं कारण नाही याऐवजी ऑक्सिजन्युक्त आणि कमी प्राणवायूयुक्त असे म्हणणे अधिक योग्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा